Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
आबुराव - अगं सुमे, रात्री मोबाइल चार्जिंगला लावत जाऊ नको.
एखाद्या दिवशी बॅटरीचा स्फोट होऊन जाईल.
सुमनताई - अहो, तुम्ही कशाला टेन्शन घेता?
असं काही होणार नाही.
मी बॅटरी काढून मोबाईल चार्जिंगला लावते.
(आबुरावांना आता चांगली झोप लागते.)
…
गुरुजी - ऑपरेशन करण्याआधी डॉक्टर पेशंटला भूल देऊन बेशुद्ध का करतात?
बंड्या - गुरुजी पेशंटला बेशुद्ध केलं नाही आणि तो ऑपरेशन करायला शिकला तर
डॉक्टरला कोण विचारणार?
(गुरुजींनी बंड्याला अॅडमिट होईपर्यंत मारला)
…
पिंट्या - पप्पा, उद्या आपण मालामाल होणार.
पप्पा - कसं काय रे?
पिंट्या - उद्या आमच्या गणिताच्या मॅडम पैशाचं रुपांतर रुपयात कसं करायचं ते शिकवणार आहेत.
(पप्पा डोकेदुखीची गोळी आणायला गेले.)