Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
डॉक्टर : तुम्ही दिवसातून किती पेग घेता ?
बापू : मी मोजून मापून कधीच पीत नाही
डॉक्टर : बघा मी तुम्हाला बरा करू शकतो, पण त्यासाठी तुम्हाला तर दारू सोडावी लागेल!
बापू : दारू सोडणं माझ्यासाठी खूप अवघड आहे डॉक्टर
डॉक्टर - ठीक आहे, मग एक काम करा…
असा नियम करा की…
प्रत्येक वेळी जेवणानंतर एकच पेग घेणार!
बापूने डॉक्टरांच्या सल्ल्यानुसार उपचार सुरू केले....
काही महिन्यांनंतर, बापूची तब्येत पूर्णपणे सुधारली....
डॉक्टर : मी सुचवलेल्या नियमामुळे तुमची तब्येत किती सुधारली आहे पाहा!
बापू: हो!
.
.
.
.
पण डॉक्टर, दिवसातून २० वेळा जेवण करणे देखील सोपे काम नाही!
(डॉक्टर आता पुन्हा मेडिकलच्या परीक्षेला बसायचा विचार करत आहे)
…
लोक नेहमी म्हणतात…
टाळी कधी एका हातानं वाजत नाही.
मी त्यांना म्हणतो…
.
.
.
.
देवानं तुम्हाला दोन हात दिलेत तर एका हातानं वाजवताच कशाला?