Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
वर्गात गणिताचा तास सुरू होता…
गुरुजींनी विचारलं, १ हजार किलो म्हणजे १ टन, तर ३ हजार किलो म्हणजे किती टन?
बंड्या - टन… टन… टन…
बंड्याला शिक्षा करावी की शाबासकी द्यावी हेच गुरुजींना कळेना!
…
लग्नानंतर दोन दिवसांनी नवरा त्या ब्युटी पार्लरमध्ये गेला, जिथं त्याच्या बायकोचा मेकअप करण्यात आला होता.
तिथं जाऊन त्यानं पार्लरवाल्या मॅडमना iPhone 7 चा डबा सुंदर पॅकिंग करून दिला.
तिनं त्याचे आभार मानले.
तो तिथून निघून जाताच पार्लरवालीनं आनंदानं डबा उघडला.
त्यात तिला नोकिया ११०० हा फोन मिळाला.
त्याखाली एक चिठ्ठी होती. त्यात लिहिलं होतं.
सेम फिलिंग!!!
…
मुलगी - आमच्या कॉलेजचे शिक्षक खूप हँडसम आणि हुशार आहेत.
ते मला खूप आवडतात.
आई - बाळा, शिक्षक हे विद्यार्थ्यांच्या वडिलांसारखे असतात.
मुलगी - आई तू नेहमी स्वत:चाच विचार करतेस. कधी तरी माझाही करत जा.
(आई बेशुद्ध)