Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
त्यानं भूत बघितलं,
त्यांनी खवीस पण बघितला,
त्यांनी उलट्या पायाचं भूतही बघितलं
असा आमच्या गावात एक म्हातारा माणूस आहे.....
पण आश्चर्य म्हणजे…
त्यानं एकही एक्झिट पोल सर्वे करणारा माणूस उभ्या आयुष्यात पाहिला नाही.
…
दोन बायका आपसात बोलत होत्या.
पहिली म्हणाली, काही वर्षांपूर्वी एका साधूबाबांनी मला सांगितलं होतं की देव तुला इतकं देईल की सांभाळता येणार नाही.
दुसरी म्हणाली, मग काय झालं?
पहिली म्हणाली, आज समजलं की ते वजनाबद्दल म्हणत होते.
…
हेही वाचा : एक्झिट पोल म्हणजे काय रे भाऊ?
चिंटू पिंटू बऱ्याच दिवसांनी एकमेकांना भेटतात.
एकमेकांची विचारपूस करतात.
चिंटू - अरे तुझा भाऊ सध्या काय करतो?
पिंटू - त्यानं एक दुकान उघडलं होतं, आता जेलमध्ये आहे.
चिंटू - असं का?
पिंटू - त्यानं हातोड्यानं दुकान उघडलं होतं?
(चिंटू बेशुद्ध)