marathi jokes : एक्झिट पोल म्हणजे काय रे भाऊ?
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : एक्झिट पोल म्हणजे काय रे भाऊ?

marathi jokes : एक्झिट पोल म्हणजे काय रे भाऊ?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 22, 2024 10:31 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : एक्झिट पोल म्हणजे काय रे भाऊ?
marathi jokes : एक्झिट पोल म्हणजे काय रे भाऊ?

Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

चार मुले घोळका करून एकाच मुलीकडे बघत उभी असतात.

नंतर ती मुलगी घोळक्याकडे बघून Smile देते.

ती गेल्यानंतर त्या चार जणात, तिनं नक्की कोणाला बघून हसली ह्याची जी चर्चा रंगते...

त्याला एक्झिट पोल असे म्हणतात!

चिंटू रिक्षावाल्याला थांबवतो.

चिंटू - स्टेशनला जायचे किती घेणार भाऊ?

रिक्षावाला - ५० रुपये होतील दादा.

चिंटू - २० रुपये घ्या ना.

रिक्षावाला - २० रुपयात कोण नेणार?

चिंटू - तुम्ही मागे बसा, मी घेऊन जातो.

भाजी कशी झालीय असं जेव्हा बायको विचारते तेव्हा धर्मसंकट उभं राहतं.

खराब म्हणण्याची सोय नसते.

चांगली झाली म्हटलं की आणखी वाढते.

(तुमच्याकडं काही उपाय असेल तर सांगा)

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner