Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
सुनबाई - सासूबाई, अहो हे अजून घरी कसे आले नाहीत?
दुसऱ्या कुणा बाईबरोबर तर गेले नाहीत ना?
सासू - अगं बाई, तू नेहमी उलटाच विचार का करतेस?
असंही झालेलं असू शकतं ना की त्याला एखाद्या ट्रकनं उडवलं असेल!
…
बंड्या रोज शाळेत उशिरा यायचा!
मॅडमनी बघून बघून घेतलं आणि एक दिवस त्याला पकडलाच!
त्यांनी विचारलं, तू बाकी मुलांसोबत का येत नाहीस?
बंड्या - झुंड में तो भेडिये आते हे मॅडम, शेर हमेशा अकेला आता है…
(मॅडमनी बंड्याचा मारून मारून उंदीर बनवून टाकला)
…
बायको - तुम्ही एक नंबरचे स्वार्थी आहात?
नवरा - काय झालं ते तर सांगशील की नाही?
बायको - तुमच्या लॅपटॉपमध्ये ते जे फोल्डर आहे, त्याचं नाव तुम्ही My Documents च्या ऐवजी Our Documents असंही ठेवू शकला असता ना?
(नवरा बेशुद्ध झाला)
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)