Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
पप्पू डॉक्टरकडे जातो.
पप्पू - डॉक्टर साहेब मला एक वेगळाच आजार जडलाय.
डॉक्टर - काय होतंय.
पप्पू - मी जेव्हा केव्हा एखाद्याशी बोलतो, तेव्हा तो मला दिसत नाही.
डॉक्टर - असं कधी होतं?
पप्पू - फोनवर बोलताना.
(डॉक्टर आता शेती करतात)
…
बायकोच्या कुठल्याही कामात नवऱ्याच्या सल्ल्याला तितकंच महत्त्व असतं, जितकं
Tea या शब्दामध्ये ea ला
…
व्हॉट्सअॅप आणि फेसबुकच्या सवयीचे साइड इफेक्ट इतके व्हायला लागलेत की विचारू नका!
काल एक माणूस न्यूजपेपर वाचत असताना त्यातला फोटो हातानं झूम करायचा प्रयत्न करत होता.
…
एक दिवस सोन्या मोन्याच्या घरी गेला.
मोन्या आणि त्याच्या बायकोचा फोटो बघून म्हणाला,
यार मोन्या, तुमची दोघांची जोडी राम-सीतेसारखी आहे.
मोन्या - कसलं काय यार!
इतक्या दिवसात ना कुणी रावण हिला उचलायला आला,
ना कधी धरणीमातेनं हिला पोटात सामावून घेतलं!