marathi jokes : तुझ्या कुंडलीत शिक्षणाचा योग आहे असं जेव्हा ज्योतिषी बंड्याला सांगतो…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : तुझ्या कुंडलीत शिक्षणाचा योग आहे असं जेव्हा ज्योतिषी बंड्याला सांगतो…

marathi jokes : तुझ्या कुंडलीत शिक्षणाचा योग आहे असं जेव्हा ज्योतिषी बंड्याला सांगतो…

HT Marathi Desk HT Marathi
Nov 18, 2024 12:17 PM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : तुझ्या कुंडलीत शिक्षणाचा योग आहे असं जेव्हा ज्योतिषी बंड्याला सांगतो…
marathi jokes : तुझ्या कुंडलीत शिक्षणाचा योग आहे असं जेव्हा ज्योतिषी बंड्याला सांगतो…

Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

 

शेजारी: अरे भाई, तुझ्या घरातनं रोज हसण्याचा आवाज येत असतो. या सुखी जीवनाचं रहस्य काय आहे?

बबलू : माझी बायको हातात जे मिळेल ते मला फेकून मारते. लागलं तर ती हसते आणि नाही लागलं तर मी हसतो!

शेजारी घर विकून गेला!

प्रेयसी - लग्नानंतर मी तुझी सगळी दु:खं वाटून घेईन

प्रियकर - पण मला कुठलंही दु:ख नाही. 

माझं सगळं मस्त चाललंय…

प्रेयसी - अरे मी लग्नानंतरच्या परिस्थितीबद्दल बोलतेय…

बंड्या एका ज्योतिषाला हात दाखवतो…

ज्योतिष - बाळा, तुझ्या कुंडलीत शिक्षणयोग आहे. तू खूप शिकशील!

बंड्या - महाराज, ते मला माहीत आहे. गेल्या तीन वर्षांपासून शिकतोय, पास कधी होणार ते सांगा

ज्योतिषानं धंदा बंद केला…

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner