Marathi Jokes : बायको सोबत असतानाही स्वत:च्या मर्जीनं वागता येतं असा दिवस कोणता?
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  Marathi Jokes : बायको सोबत असतानाही स्वत:च्या मर्जीनं वागता येतं असा दिवस कोणता?

Marathi Jokes : बायको सोबत असतानाही स्वत:च्या मर्जीनं वागता येतं असा दिवस कोणता?

HT Marathi Desk HT Marathi
Nov 17, 2024 10:22 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

Marathi Jokes : बायको सोबत असतानाही स्वत:च्या मर्जीनं वागता येतं असा दिवस कोणता?
Marathi Jokes : बायको सोबत असतानाही स्वत:च्या मर्जीनं वागता येतं असा दिवस कोणता?

Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

 

तब्बल पाच वर्षातून एकदाच येणारा योग!

बायको बरोबर असतांना देखील आपले स्वतःचे मत नोंदविता येते!!

.

.

.

२० तारखेला मिळालेल्या संधीचे सोने करा.

दुकानदार - काय पाहिजे?

ग्राहक - मला माझ्या बायकोविरुद्ध लढण्यासाठी

ताकद आणि हिम्मत पाहिजे.

दुकानदार - अरे, साहेबांना एक क्वार्टर,

सोडा आणि मूग डाळ द्या.

बायको, चांदण्या रात्री आकाशाकडं बघत नवऱ्याला विचारते,

अहो, मला सांगा. अशी कोणती गोष्ट आहे. जी तुम्ही रोज बघू शकतं पण तोडू शकत नाही.

नवरा - मी नाही सांगणार.

बायको - सांगा ना, प्लीज

नवरा - तुझं तोंड.

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner