Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
चिंगीने इंग्लिश स्पिकींगचा कोर्स पूर्ण केला
आणि
चिंटूला म्हणाली की, कोणताही प्रश्न विचार मी तो मराठीत ट्रांन्सलेट करून सांगते!
चिंटू म्हणाला, शेअर इटला मराठीत काय म्हणतात सांग बरं?
चिंगी म्हणाली,
.
.
.
वाघ जेवतोय...
---------------------------
मन्याला कुत्रा घेऊन फिरताना पाहून राजूने विचारले, 'तुझा कुत्रा चावतो का?'
मन्या म्हणाला, 'छे! अजिबात नाही.'
राजूने कुत्र्याशी खेळण्याचा प्रयत्न केला.
कुत्र्याने त्याचा कचकचीत चावा घेतला.
'ओय ओय' करत राजू म्हणाला, 'तू काय म्हणालास तुझा कुत्रा चावत नाही!'
मन्या उत्तरला, 'पण, हा माझा कुत्रा नाही!
---------------------------
एकदा एका शाळेत डेप्युटी शाळा तपासायला आले.
एका वर्गांत त्यांनी फळ्यावर
'NATURE' अशी अक्षरे लिहिली आणि एका मुलाला विचारले,
‘हा काय शब्द आहे?’
क्षणाचाही विलंब न लावता मुलगा म्हणाला, ‘नटुरे’.
त्यानंतर एक एक करून सर्व मुलांना तोच प्रश्न विचारला.
सर्व मुलांनी तेच सांगितले ‘नटुरे’.
.
.
डेप्युटी संतापले. शिक्षकाला म्हणाले, ‘हा काय प्रकार आहे?’
शिक्षक उत्तरले ‘पोरं अजून 'मटुरे' (mature ) झालेली नाहीत. नंतर सुधारतील.’
.
.
डेप्युटी वैतागून सर्वांना घेवून हेड-मास्तरांकडे गेले व त्यांना झालेला किस्सा सांगितला.
त्यावर शांतपणे हेडमास्तर म्हणाले, ‘जाऊ द्या हो साहेब! या गोष्टीचा त्यांच्या 'फुटुरे'वर (future) कांहीच परिणाम होणार नाही.’