Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एक माणूस पळत पळत पोलीस चौकीत आला!
त्याला बोलताही येत नव्हतं!
पोलिसांनी त्याला शांत केलं, प्यायला पाणी दिलं!
पोलीस - काय झालं? तुम्ही एवढे घाबरलेले का दिसताय?
तक्रारदार - साहेब, माझ्या मित्राचा आयुष्य धोक्यात आहे.
पोलिसांना नेमकं काही समजलं नाही!
पोलीस - शांत व्हा. नीट सांगा.
तक्रारदार - साहेब, माझ्या मित्राचा जीव धोक्यात आहे.
पोलीस - का काय झालं?
तक्रारदार - साहेब, तो माझ्या बायकोसोबत पळून गेलाय.
…
न्यायाधीश - तुझ्यावर आरोप आहे की तू लग्न झाल्यापासून तुझ्या बायकोला घाबरून, धमकावून ताब्यात ठेवलंय.
आरोपी - नाही जज साहेब. असं काही नाही.
न्यायाधीश - अरे बाबा, घाबरू नको.
तू हे सगळं कसं केलंस ते आयडिया सांग.
…
पोलीस - (चोराला) तू धडधाकट दिसतोस. चोरी का करतोस? कामधंदा कर ना!
चोर - साहेब, मी तुमच्यासाठी, तुमच्या मुलांसाठीच चोरी करतो.
पोलीस - (संतापून) काय बोलतोयस तू?
चोर - साहेब, खरं आहे.
मी चोरी केली नाही तर तुम्हाला काम कशी मिळणार? तुमचं डिपार्टमेंट बंद होईल.