Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एका चोराला कोर्टासमोर हजर केलं जातं.
वकील त्याची उलटतपासणी घेतात. मग न्यायाधीश त्याला विचारतात…
न्यायाधीश - सगळे लोक घरात असताना तू चोरी कशी केलीस?
चोर - साहेब, तुम्हाला चांगली नोकरी आहे. भरपूर पगार आहे.
तुम्ही हे सगळं शिकण्याची काय गरज आहे?
…
दोन मुली बसमध्ये सीटसाठी भांडत होत्या.
कंडक्टरनं मध्यस्थी केली.
कशाला भांडताय? समजून घ्या.
ज्याचं वय जास्त असेल तिनं बसून घ्या.
मग काय?
शेवटच्या स्टॉपपर्यंत दोघी उभ्या होत्या.
…
बायको - तुम्ही माझ्यावर किती प्रेम करता?
नवरा - खूप
बायको - तरी पण किती सांगा ना!
नवरा - तू मला एवढी आवडतेस की असं वाटतं तुझ्यासारखी आणखी एक असावी.