Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
सोनू - बाबा, बेवडा कोणाला म्हणतात?
बाबा - बाळा, ह्या समोर ४ गाड्या आहेत ना, बेवड्याला त्या ८ दिसतात.
तसं असलं तर समजायचं हा माणूस बेवडा आहे.
सोनू - पण बाबा, समोर तर फक्त २ गाड्या आहेत.
…
गुरुजी - वाघाच्या शेपटीवर पाय देणे… या म्हणीचा अर्थ सांगा पाहू मुलांनो.
बंड्या - बायकोला माहेरी जाण्यापासून थांबवणं.
(बंड्या आता वर्गाचा मॉनिटर झालाय)
…
पप्पू नोकरीची मुलाखत द्यायला गेला.
कंपनीत जोखमीचं काम होतं.
इकडची तिकडची विचारपूस केल्यानंतर मॅनेजरनं प्रश्नोत्तरं सुरू केली!
मॅनेजर - आपल्याकडचं काम नाजूक आहे. त्यात मोठी जोखीम असते.
तुम्ही आजपर्यंत कधी एखादी मोठी जोखीम घेतलीय का?
पप्पू - हो.
मॅनेजर - कोणती?
पप्पू - देवाकडं पुढच्या जन्मी सुद्धा हीच बायको मागितलीय.
(मॅनेजरनं दुसरा प्रश्नच विचारलं नाही. थेट अपॉइंटमेंट लेटर दिलं.)