Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एके सकाळी पप्प्या तयारी करून बाहेर पडतो.
स्टॉपवर येऊन टॅक्सी थांबवतो.
पप्प्या - सिद्धिविनायकला जाणार का?
टॅक्सीवाला - हो
पप्प्या - ठीक आहे. जाऊन या पण परत येताना माझ्यासाठी प्रसाद घेऊन या.
…
संप्या बराच वेळ स्वत:चं मॅरेज सर्टिफिकेट बघत बसला होता.
संप्याची बायको - काय हो, एवढं काय बघताय त्यात?
संप्या - अगं एक्सपायरी डेट शोधतोय.
बहुतेक ते टाकायलाच विसरलेत.
…
नोकर - साहेब मला केराच्या टोपलीत शंभराच्या पाच नोटा सापडल्या, हे घ्या.
मालक - मीच फेकून दिल्या होत्या.
नकली आहेत त्या.
नोकर - म्हणूनच परत करतोय.