Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
आमच्याकडं वरचेवर पाहुणे यायचे.
अक्षरश: वीट आला होता.
मग पुण्यातल्या मावशीनं मला मल्टीलेव्हल मार्केटिंगचा व्यवसाय सुरू करायला सांगितला.
मी तिचा सल्ला ऐकला.
तेव्हापासून दोन वर्षे झाली आमच्याकडं
एकही नातेवाईक फिरकला नाही!
…
हेही वाचा : कोलंबसला मराठी बायको असती तर…
दिन्या आणि मन्या जंगलात गेले होते.
समोरून अचानक वाघ आला.
मन्यानं प्रसंगावधान राखून वाघाच्या डोळ्यात माती फेकली आणि
दिन्याला म्हणाला, दिन्या पळ.
दिन्या चिडून म्हणाला,
मी का पळू? माती तू फेकलीयस!
…
भाजीवाला खूप वेळ भाज्यांवर पाणी शिंपडत असतो.
शेवटी एक बाई वैतागून म्हणते,
भेंडी शुद्धीवर आली असेल तर,
एक किलो द्या!