Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
गुरुजी : सांगा पाहू, दिवाळी आपल्याला आयुष्य जगण्यासाठी काय शिकवते?
मन्या दुसऱ्या सेकंदाला हात वर करतो!
गुरुजी - हा मनू सांग बघू.
मन्या : काडी लावून लांब पळायचं आणि लांबून मजा बघायची!
(गुरुजींनी मन्याला धु-धु धुतला)
…
कार्यकर्ते पण एक एक नमुने असतात.
स्मशानभूमीच्या भिंतीवर लिहून आले की…
२०२४ ला आमचे साहेब येणारच!
…
कोलंबसला मराठी बायको असती तर,
त्यानं अमेरिकेचा शोध कधीच लावला नसता!
का?
कारण सोप्पं आहे. कारण, त्याला बायकोनं विचारलं असतं…
कुठं चाललात…
कोणा बरोबर जाणार…
कसे जाणार…
काय शोधायला जाताय…
इकडे मिळणार नाही का…
नेहमी तुम्हालाच हे काम का देतात…
सोबत कोणी आहे का…
तिथं दारू तर पिणार नाही ना…
मी इथं एकटी काय करू…
मी पण तुमच्याबरोबर येऊ का…
…
कोलंबस जाऊ दे, नाही जात.