marathi jokes : बस आणि सायकलमध्ये काय फरक आहे असं जेव्हा गुरुजी मुलांना विचारतात…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : बस आणि सायकलमध्ये काय फरक आहे असं जेव्हा गुरुजी मुलांना विचारतात…

marathi jokes : बस आणि सायकलमध्ये काय फरक आहे असं जेव्हा गुरुजी मुलांना विचारतात…

HT Marathi Desk HT Marathi
Nov 07, 2024 12:20 PM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : बस आणि सायकलमध्ये काय फरक आहे असं जेव्हा गुरुजी मुलांना विचारतात…
marathi jokes : बस आणि सायकलमध्ये काय फरक आहे असं जेव्हा गुरुजी मुलांना विचारतात…

Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

 

बंड्याचे आजोबा त्याला भेटायला त्याच्या शाळेत जातात.

शाळेच्या आवारातच त्यांना बंड्याचे वर्गशिक्षक भेटतात.

आजोबा - गुरुजी, जरा बंड्याला बोलवता का? 

मला त्याला भेटायचं आहे.

गुरुजी - अहो तो तर आज तुमच्या दहाव्याला गेलाय.

गुरुजी सामान्य ज्ञानाची तोंडी परीक्षा घेत असतात.

गुरुजी - बस आणि सायकलमध्ये काय फरक आहे?

मन्या - सोप्पं आहे सर,

आपण बसचं स्टँड सगळीकडं घेऊन जाऊ शकत नाही, पण सायकलचं स्टँड कुठंही घेऊन जाऊ शकतो.

एकदा एका शाळेतील शिक्षकांना विमानात बसवलं जातं.

टेकऑफच्या आधी सूचना दिल्या जातात. 

तेव्हा सांगितलं जातं की हे विमान तुमच्या विद्यार्थ्यांनी बनवलं आहे.

हे ऐकून शिक्षक हादरून जातात आणि पटापट विमानातून उतरतात.

फक्त शाळेचे मुख्याध्यापक शांतपणे विमानात बसून राहतात.

इतर शिक्षकांना आश्चर्य वाटतं.

ते मुख्याध्यापकांना विचारतात,

सर, तुम्हाला भीती वाटत नाही का?

मुख्याध्यापक - अजिबात नाही.

मला माझ्या विद्यार्थ्यांवर पूर्ण विश्वास आहे.

हे विमान सुरूच होणार नाही.

(माणूस मुख्याध्यापक उगाच होत नाही)

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner