Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
गाडीवरून लिफ्ट दिल्यानंतर… लोकांच्या प्रतिक्रिया
नाशिक - धन्यवाद भाऊ
कोल्हापूर - लय आभार मित्रा
मुंबई - थँक यू सो मच
पुणे - रोज इकडूनच जाता का तुम्ही?
…
जन्या - सांग, I Love You शब्दाचा जन्म कुठे झाला?
मन्या - चीनमध्ये
जन्या - ते कसं काय?
मन्या - या शब्दात सगळे चिनी वस्तूचे गुण आहेत.
नो गॅरंटी, नो वॉरंटी.
…
तुम्हाला बारीक व्हायचंय?
मग या खास टिप्स तुमच्यासाठी आहेत…
अशा वस्तूंपासून नेहमी दूर राहा.
आरसा, फोटो, वजनकाटा आणि सडपातळ मैत्रीण
…
काल ताप आल्याचा बहाणा सांगून सुट्टी घेतली.
आज खरोखरच ताप आला…
विचार करतोय की पुढच्या आठवड्यात लग्नाच्या बहाण्यानं सुट्टी घ्यावी.