Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
बायकोला स्वर्गात जागा मिळाली तरी
ती नरकात वाकून बघणारच
की आपला नवरा
एखाद्या चेटकिणीसोबत तर नाही ना!
…
रात्री जेवताना नवरा म्हणाला,
अगं आणखी एक चपाती दे ना
बायको - संपल्या!
नवरा - कशा काय गं?
बायको - दुपारी शॉपिंग करताना तुमचे पैसे संपले होते तशा
(बायको जोमात, नवरा कोमात)
…
मन्या - अरे घरातल्यांनी जाम वैताग आणलाय.
जन्या - का रे काय झालं?
मन्या - त्यांना घड्याळात किती वाजले तेही बघता येत नाही.
जन्या - म्हणजे?
मन्या - रोज सकाळी मला झोपेतनं उठवतात आणि म्हणतात उठ.
घड्याळात किती वाजले बघ!
(जन्या तोंडात मारल्यासारखा निघून गेला)