Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
विज्ञानाचा क्लास सुरू असतो. गुरुजी प्रश्न विचारतात…
गुरुजी - अंड्यातून पिल्लू कसं बाहेर येतं, सांगा पाहू!
बंड्या - गुरुजी ते बाहेर येतं यात काही विशेष नाही.
गुरुजी - खरा प्रश्न हा आहे की ते आत घुसतंच कसं?
(गुरुजींनी बंड्याचा कोंबडा केला)
…
गुरुजी - कोंबडी आधी की अंडं?
संपूर्ण वर्गात शांतता पसरते.
बंड्या - सोप्पं आहे गुरुजी!
आपण जी ऑर्डर देऊ ते आधी येणार!
(गुरुजींनी शाळा सोडली)
…
पेपरमध्ये प्रश्न होता.
शास्त्रीय कारणे लिहा.
प्रश्न - डोक्यावर पांघरूण घेऊन का झोपू नये?
एका कार्ट्यानं उत्तर लिहिलं!
कारण, कोण झोपलंय ते कळत नाही!
…
इंग्रजीच्या तासाला गुरुजी वाक्याचं भाषांतर करायला देतात.
गुरुजी - मुलांनो सांगा बरं,
She was a new student and looking happy
या वाक्याचं मराठीत भाषांतर करा…
बंड्या - कुण्या गावाचं आलं पाखरू, बसलंय डोलात नी खुदूखुदू हसतंय गालात!
(गुरुजींनी बंड्याला धु धु धुतला)