Viral jokes in Marathi : आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
बाबूचं लग्न झालं आणि त्याचा संसार सुरू झाला.
एकदा बाबूने सहज त्याच्या त्याच्या बायकोला प्रश्न केला.
बाबू : तू माझ्यात असं काय पाहिलंस की मला डायरेक्ट लग्नाला हो म्हणालीस?
बाबूची बायको : मी तुम्हाला एकदोन वेळेस भांडी घासताना पाहिलं होतं!
----------------------------------
चिंगी : मस्त मोबाईल आहे कुठून घेतलास. ?
चिंटू : विकत नाही घेतला, मला धावण्याच्या शर्यतीत बक्षीस मिळाला आहे.
चिंगी : कितीजण होते धावायला. ?
.
.
.
चिंटू : मोबाईल दुकानाचा मालक, पोलिस आणि मी....!!!
----------------------------------
गुरूजी : पराकोटीच्या विरोधाभासासाचं उदाहरण सांगा बघू.
बंड्या : सर,पाकिस्तानच्या नेत्याचं नाव शरीफ आहे.
----------------------------------
बारक्या लंगडत लंगडत शाळेत उशीरा पोहोचला.
इंग्रजीचे सर ओरडले म्हणाले, ‘व्हाय आर यू लेट?’
इंग्रजीत सुमार बारक्या म्हणाला, ‘सर रस्त्यावर चिख्खल झाला होता आणि तिथे उभ्या बैलाने ढुशी मारली. माझा पाय मोडला. म्हणून उशीर झाला.’
सर पुन्हा ओरडले, ‘टॉक इन इंग्लिश!’
हजरजबाबी बारक्याने म्हटले, ‘सर देयर वॉज चिखलीपिकेशन ऑन रोड. काऊज हसबण्ड केम मारिंग मी शींगडा मेड मी लंगडा. सो आय कम लेट!’
----------------------------------
एकदा टीना आणि चिंकी बाहेर हॉटेलमध्ये सामोसा खात असतात.
चिंकी : अगं टीना, तू सामोस्यामधील भाजीच का खात आहेस?
टीना : कारण माझी आई म्हणते बाहेरचं काही खाऊ नये.
----------------------------------
चंप्या : तू उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस..??
चिंगी : सहा..
चंप्या : चूक...फक्त १ खाऊ शकतेस तू!
कारण १ सफरचंद खाल्ल्यानंतर तू उपाशीपोटी नसते.
चिंगी : मस्त सुपर जोक आहे हा...
.
.
.
मग ती चिंगी आपल्या मैत्रिणीला हा जोक सांगायला जाते...
सांग ग मयुरी तू उपाशीपोटी किती सफरचंद खाऊ शकतेस..??
मयुरी : नऊ..
.
.
चिंगी : तू ६ बोलली असतीस, तर मी तुला एक मस्त जोक सांगणार होते...