Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
शाळेत इंग्रजीचा तास सुरू असतो. गुरुजी मुलांना अधूनमधून प्रश्न विचारत असतात.
गुरुजी - बंड्या, 'मी तुझा जीव घेईन…' याचं इंग्रजी भाषांतर कर.
बंड्या - ते इंग्रजी आणि भाषांतर गेलं उडत.
तुम्ही मला हात तर लावून बघा.
(गुरुजींनी हात दुखेपर्यंत मारला)
…
परीक्षा सुरू असते.
पप्प्या पाच मिनिटांत पेपर देऊन जाऊ लागतो.
गुरुजी - काय रे पप्पू. पेपरातलं काहीच येत नाहीए का तुला
पप्प्या - तसं नाही सर,
मला उद्याच्या पेपरचा अभ्यास करायचा आहे म्हणून लवकरच जातोय.
…
शिक्षक - आजचा ऑनलाइन क्लास संपला.
कुणाला काही डाउट असेल तर विचारा…
संप्या - सर, तुम्हाला चहा द्यायला आली होती ती तुमची मुलगी होती का?
संबंधित बातम्या