Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
शिक्षणअधिकारी शाळेची पाहणी करण्यासाठी येतात…
शिक्षणाधिकारी - गुरुजी, तुमच्या वर्गात सगळ्यात हुशार कोण आहे?
गुरुजी - बंडू
शिक्षणाधिकारी - बंडू, सांग पाहू सहा पंचे किती?
बंडू - पंचेचाळीस सर.
शिक्षणाधिकारी - काय गुरुजी, तुम्ही तर म्हणत होता की बंडू हुशार आहे म्हणून
गुरुजी - खरं आहे सर, बंडूच थोडं जवळचं उत्तर देतो.
बाकी सगळे शंभरच्या वर देतात.
(शिक्षणअधिकारी तेव्हापासून आजारी आहेत.)
…
वर्गात विज्ञानाचा तास सुरू असतो.
गुरुजी मुलांना एका मागोमाग एक प्रश्न विचारत असतात.
गुरुजी - माशी आणि डासामध्ये काय फरक आहे?
पप्प्या - मी सांगू का गुरुजी?
गुरुजी - हो. सांग ना पप्पू
पप्प्या - गुरुजी, माशी माणसाला फक्त तपासते.
डास डायरेक्ट इंजेक्शन देतो.
…
गुरुजी - आज तू उशिरा का आलास?
शाळा तर आठ वाजता सुरू होते.
पिंट्या - गुरुजी, तुम्ही माझी काळजी करत जाऊ नका.
बिनधास्त शाळा सुरू करत जा!
गुरुजींनी पिंट्याला चोप चोप चोपला!
संबंधित बातम्या