Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
घरात नव्यानं आलेल्या सुनेच्या वागण्याला सासू कंटाळली होती…
सूनबाई सकाळी आरामशीर उठायची. नवरा चहा बनवून द्यायचा.
सून नवी असल्यानं सासूला काही बोलताही येत नव्हतं.
पण रोजरोजचं हे सगळं बघून सासूला काही राहावलं नाही.
एक दिवस सुनेला झोपलेली पाहून सासू बोललीच!
हे काय कुंभकर्णासारखी झोपून राहिलेस
सूर्य बघ किती वर आला!
सूनबाई (जांभई देत) - असू द्या सासूबाई. तो झोपतो पण माझ्याआधी.
…
बायको - बंदूक घेऊन दारात का थांबलाय तुम्ही?
नवरा - वाघाची शिकार करायला जातोय.
बायको - मग जा ना, थांबलात का?
नवरा - बाहेर कुत्रा आहे. तो गेला की जातो.
…
शाळेत इंग्रजी व्याकरणाचा त्रास सुरू असतो…
गुरुजी मुलांना प्रश्न विचारतात…
गण्या सांग, Shall कधी वापरतात.
गण्या - थंडीत सर.
गुरुजींनी गण्याला घाम येईपर्यंत मारला!
संबंधित बातम्या