marathi jokes : डॉक्टर जावई जेव्हा आपल्या सासऱ्याचं ऑपरेशन करण्याची तयारी करतो…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : डॉक्टर जावई जेव्हा आपल्या सासऱ्याचं ऑपरेशन करण्याची तयारी करतो…

marathi jokes : डॉक्टर जावई जेव्हा आपल्या सासऱ्याचं ऑपरेशन करण्याची तयारी करतो…

HT Marathi Desk HT Marathi
Oct 24, 2024 10:46 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : डॉक्टर जावई जेव्हा आपल्या सासऱ्याचं ऑपरेशन करण्याची तयारी करतो…
marathi jokes : डॉक्टर जावई जेव्हा आपल्या सासऱ्याचं ऑपरेशन करण्याची तयारी करतो…

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

अर्ध्या तासापासून बायको मोबाईल कॅमेरा रुमालाने साफ करत होती.

सेल्फी काढायची, डिलिट करायची आणि पुन्हा कॅमेरा साफ करायची.

बाजूलाच नवरा लॅपटॉपवर काम करत होता.

त्याला राहावलं नाही. तो म्हणाला,

जरा रुमाल चेहऱ्यावर फिरवून ट्राय कर.

(पुढं काय झालं असेल ते सांगायची गरज आहे का?) 

एक म्हातारा ऑपरेशन टेबलावर झोपला होता.

त्याचं मोठं ऑपरेशन होणार होतं.

ऑपरेशन त्याचा डॉक्टर जावई करत होता.

सगळी तयारी झाली आणि ऑपरेशन सुरू होणार तोच,

सासऱ्यानं जावयाचा हात पकडला आणि म्हणाला,

जावईबापू, मला माहीत आहे तुम्ही मला काही होऊ देणार नाही.

पण काही अघटीत घडलंच तर तुमच्या सासूबाई तुमच्याकडं राहायला येतील.

त्यांची काळजी घ्या.

(ऑपरेशन एकदम सक्सेसफूल झालं!) 

संध्या त्याच्या मित्राला फोन करते…

संध्या - मला विसरून जा शुभम.

आता माझं लग्न होणार आहे.

मित्र - अगं पण माझं नाव रितेश आहे.

संध्या - तू पण विसरून जा आणि शुभमला पण सांग.

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner