marathi jokes : भिंतीतून आरपार दिसावं म्हणून विद्यार्थी जेव्हा यशस्वी प्रयोग करतात…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : भिंतीतून आरपार दिसावं म्हणून विद्यार्थी जेव्हा यशस्वी प्रयोग करतात…

marathi jokes : भिंतीतून आरपार दिसावं म्हणून विद्यार्थी जेव्हा यशस्वी प्रयोग करतात…

HT Marathi Desk HT Marathi
Oct 22, 2024 10:18 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : भिंतीतून आरपार दिसावं म्हणून विद्यार्थी जेव्हा यशस्वी प्रयोग करतात…
marathi jokes : भिंतीतून आरपार दिसावं म्हणून विद्यार्थी जेव्हा यशस्वी प्रयोग करतात…

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

नानांना ताप आला… 

घसाही दुखत होता…

नाना दवाखान्यात गेले!

वयामुळं त्यांना ऐकायला कमी येत होते.

डॉक्टर त्यांना म्हणाले, वाफ घ्या!

नानांनी ऐकलं, हाफ घ्या!

(नाना आता एकदम ठणठणीत आहेत.)

आज पुरणपोळीचा बेत होता

नवरा जेवायला बसला!

नवरा - (पोळीकडे बघून) पोळ्या करपल्यात!

बायको नवऱ्याकडं वळून बघते.

नवरा - छान कुर्रूम कुर्रूम लागतायत.

टेक्निकल कोर्सचे विद्यार्थी धावत-धावत गुरुजींकडे येतात.

विद्यार्थी - सर, आम्ही असा काही प्रयोग केलाय की ज्यामुळं तुम्ही भिंतीच्या आरपार पाहू शकता.

शिक्षक - शाब्बास! काय केलंय नेमकं तुम्ही?

विद्यार्थी - सर, आम्ही भिंतीला भोक पाडलंय!

 

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner