Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
वर्गात गणिताचा तास सुरू असतो…
गुरुजी - दहा नारळांपैकी तीन नारळ नासले तर किती नारळ शिल्लक राहतील?
गण्या - १० नारळ
गुरुजी - कसं काय रे?
गण्या - नासलेले नारळ सुद्धा नारळच असतील.
त्याचा काय फणस होईल का?
(गुरुजींनी गण्याला मॉनिटर बनवला)
…
मोबाईलमुळं लोक इतके वेडे झालेत आहेत की विचारता सोय नाही!
काल मी माझ्या एका मैत्रिणीला फोन करून सांगितलं की,
मी फ्लॅट घेतलाय!
तर ती म्हणाली…
किती जीबीचा!
…
आई नेहमी म्हणते की खोटं बोलायचं नसतं.
रोज सकाळी ७ वाजता आईच म्हणते…
पम्या, ऊठ लवकर किती झोपलायस
१० वाजून गेले!
…
आधी रस्ते साधे होते…
तेव्हा माणसं पण साधी होती
आता रस्ते डांबरी झालेत
तर माणसे डांबरट झालीत!