Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
पम्या आणि चम्या दोघे सख्खे भाऊ. ते एकाच वर्गात शिकत होते.
परीक्षेचा पेपर पाहून मुख्याध्यापकांनी त्यांना ऑफिसमध्ये बोलावलं.
मुख्याध्यापक - काय रे पम्या, चम्या.
तुम्ही दोघे सख्खे भाऊ आहात ना, मग उत्तरपत्रिकेत वडिलांचं नाव वेगवेगळं का लिहिलं?
चम्या - काय सर, परत तुम्हीच बोलला असतात, कॉपी केली म्हणून.
मुख्याध्यापक जागेवरच कोसळले!
…
गुरुजी - जर कुणी शाळेच्या समोर बॉम्ब ठेवला तर तुम्ही काय कराल?
बंड्या - एक-दोन तास बघेन नाहीतर सरळ उचलून स्टाफरूममध्ये जमा करेन.
नियम म्हणजे नियम
…
वर्गात व्याकरणाचा तास सुरू असतो…
गुरुजी विचारतात,
ती मुलगी सर्व मुलांकडे पाहून हसते, या वाक्यात ती मुलगी काय आहे?
मक्या - ती मुलगी 'चालू' आहे!