marathi jokes : दिवाळीत आकाशात उडणाऱ्या रॉकेटला पाहून काय शिकालं, असं जेव्हा गुरुजी विचारतात…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : दिवाळीत आकाशात उडणाऱ्या रॉकेटला पाहून काय शिकालं, असं जेव्हा गुरुजी विचारतात…

marathi jokes : दिवाळीत आकाशात उडणाऱ्या रॉकेटला पाहून काय शिकालं, असं जेव्हा गुरुजी विचारतात…

HT Marathi Desk HT Marathi
Published Oct 17, 2024 09:45 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : दिवाळीत आकाशात उडणाऱ्या रॉकेटला पाहून काय शिकालं, असं जेव्हा गुरुजी विचारतात…
marathi jokes : दिवाळीत आकाशात उडणाऱ्या रॉकेटला पाहून काय शिकालं, असं जेव्हा गुरुजी विचारतात…

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

शेजारचे काका - काय बेटा, अभ्यास कसा चालला आहे?

पिंट्या - काय सांगू का, असा चालत-चालत निघालाय की माझ्यापासून खूप दूर गेलाय.

(काका आता कधीच पिंट्याला अभ्यासाबद्दल विचारत नाहीत)

गुरुजी - दिवाळीत आकाशात उडणाऱ्या रॉकेटकडं पाहून काय शिकावं?

नाऱ्या - खूप उंचीवर पोहोचायचं असेल तर…

बाटलीचा आधार घ्यावा लागतो सर!

(नाऱ्याला गुरुजींनी तुडवून तुडवून मारला)

हेडमास्तर - काय रे बंड्या, शाळेत यायला आज उशीर का झाला?

बंड्या - काय करणार सायकल खराब झाली होती सर

हेडमास्तर - एसटीनं यायचं ना गधड्या

बंड्या - मीही तेच म्हणत होतो सर

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner