Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
वर्गात गणिताचा तास सुरू असतो…
गुरुजी - दोनमधून दोन गेल्यावर किती राहतील?
पप्पू - माहीत नाही गुरुजी
गुरुजी - अरे समज, तुझ्या ताटात दोन भाकरी आहेत आणि मी त्या दोन्ही काढून घेतल्या तर काय उरेल?
पप्पू - ताट
(गुरुजींनी त्याच दिवशी राजीनामा दिला)
…
झंप्या - काय मित्रा, हल्ली तू कविता वगैरे लिहीत नाहीस
चंप्या - जिच्यासाठी लिहायचो तिचं आता लग्न झालं.
झंप्या - मग तिच्या आठवणीत लिही. आधीपेक्षा छान होतील.
चंप्या - तिचं माझ्याशीच लग्न झालंय.
…
शाळेत इंग्रजीचा तास सुरू असतो. गुरुजी विचारतात…
गुरुजी - सांगा, मुलांनो, It कुठे वापरतात?
हरी - घर बांधताना…
गुरुजींनी हरीला घरी पाठवला…