Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
नवऱ्यानं बायकोला सरप्राइज देण्यासाठी नवीन कार विकत घेतली आणि मोठ्या तोऱ्यात घरी निघाला…
दरवाजात पोहोचताच त्यानं बायकोला आवाज दिला आणि म्हणाला…
प्रिये, बघ आज तुझं इतक्या वर्षांचं स्वप्न पूर्ण झालं…
बायको स्वयंपाकघरातूनच ओरडली...
अरे बापरे! सासूबाईंना काय झाले, सकाळी तर चांगल्या होत्या !!!
...
हेही वाचा : आपल्या देशातला तरुण आता जागा झालाय, आता तो…
बायकांचा राग लटका असतो.
पण तो आला की काही खरं नाही.
राग आल्यावर त्या काय करतील सांगता येत नाही.
त्या नवऱ्याशी बोलत नाहीत, इथपर्यंत ठीक आहे.
पण त्या भांडी का आपटतात?…
कारण, भांड्यांवर नवऱ्याचं नाव असतं.
तेवढंच नवऱ्याला उचलून उचलून आपटल्याचं समाधान!