Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
माणूस पण मोठा गमतीशीर आहे…
आधी भिकारी बनून
देवासमोर हात जोडून याचना करतो
एकदा पैसा आला की मग
गर्वाने देवालाच दान देऊन
खाली स्वत:चं नाव लिहून घेतो!
…
एका मुलीनं मेडिकलमधून औषध घेतलं.
ते घेतल्यानंतर केमिस्टला म्हणाली,
साखर पण द्या.
केमिस्ट म्हणाला, इथं साखर मिळत नाही.
मुलगी - मी वेडी नाही. शिकलेली आहे. औषधाच्या पाकिटावर लिहिलंय 'शुगर फ्री'
(तेव्हापासून केमिस्ट बीपीच्या गोळ्या खातोय)
…
सासरा (जावयाला) - जावई बापू, तुम्ही दारू पिता.
हे आम्हाला आधी का सांगितलं नाही?
जावई - तुमची मुलगी रक्त पिते ते तुम्ही सांगितलं का?