Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
काकू: हिंदी भाषेपेक्षा आपली मराठी चांगली आहे. तुम्हाला काय वाटतं?
काका: ते कसं काय?
काकू: हिंदीमध्ये ‘अ न प ढ’ असं संपूर्ण म्हणावं लागतं…
मराठीत तर फक्त 'ढ' म्हटलं तरी चालतंय..!!!
मराठी भाषेस अभिजात दर्जाच्या शुभेच्छा…
…
जर वडिलांनी मुलीच्या घरासमोर घर घेतलं...
तर त्याला…
'लेक व्ह्यू'… नाव देता येईल का?
एक पुणेरी शंका!!!
…
आज मी स्वत:च्या आवाजात एक गाणं रेकॉर्ड करून ऐकलं!
आणि नंतर
भविष्यात कधीही असला फाजिलपणा करणार नाही अशी शपथ घेतली!