marathi jokes : चांगली बायको नेमकी कशी असते? एकदा वाचा!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : चांगली बायको नेमकी कशी असते? एकदा वाचा!

marathi jokes : चांगली बायको नेमकी कशी असते? एकदा वाचा!

HT Marathi Desk HT Marathi
Published Oct 04, 2024 09:55 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : चांगली बायको नेमकी कशी असते? एकदा वाचा!
marathi jokes : चांगली बायको नेमकी कशी असते? एकदा वाचा!

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

चांगली बायको कधीच त्रास देत नाही

कधीच खोटं बोलत नाही

कधीच विश्वासघात करत नाही

कधी संशय घेत नाही की

कधी पैसे मागत नाही

कधी शॉपिंगलाही जात नाही

आणि

अशी बायको जगात सापडतही नाही!

एखाद्या डॉक्टरनं हिंदी सिनेमे बनवले तर त्यांची नावं काय असतील…

कधी खाँसी कभी बुखार

कहो ना बुखार है

टीबी नंबर वन

हम ब्लड दे चुके सनम

रहना है अब हस्पताल में

बचना एै मरिजो

दिल तो कमजोर है जी

अजब मरीज की गजब बिमारी

(ही यादी तुम्ही वाढवू शकता)

बायको - बाजूवाल्यांच्या घरी नवरा-बायकोचं भांडण सुरू आहे.

तुम्ही एकदा जाऊन बघा ना काय चाललंय ते.

नवरा - एक-दोनदा गेलो  होतो.

त्यावरूनच भांडण सुरू आहे.

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner