marathi jokes : लग्न झालेला एक गृहस्थ जेव्हा हिंदी कविता सादर करतो…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : लग्न झालेला एक गृहस्थ जेव्हा हिंदी कविता सादर करतो…

marathi jokes : लग्न झालेला एक गृहस्थ जेव्हा हिंदी कविता सादर करतो…

HT Marathi Desk HT Marathi
Published Oct 03, 2024 10:13 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : लग्न झालेला एक गृहस्थ जेव्हा हिंदी कविता सादर करतो…
marathi jokes : लग्न झालेला एक गृहस्थ जेव्हा हिंदी कविता सादर करतो…

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

 

नवरा - तुला दशरथ राजा माहीत आहे?

बायको - हो. माहीत आहे. मी बरंच वाचलंय त्यांच्याबद्दल.

नवरा - त्यांना तीन बायका होत्या.

बायको - हो माहीत आहे.

नवरा - म्हणजे मी सुद्धा आणखी दोन लग्नं करू शकतो.

बायको - तुम्ही द्रौपदीचं नाव ऐकलंय?

नवरा - (हादरून) अंग मी मस्करी करतोय. तू लगेच सीरियस होतेस.

बायको नवऱ्याला फोन करते.

बायको - काय हो. कुठं आहात तुम्ही?

नवरा - ऑफिसमध्ये आणखी कुठं असणार?

का, काय झालं?

बायको - काही नाही.

ती आपली बाजूवाली पळून गेलीय ना म्हणून विचारलं.

लग्न झालेल्या एक गृहस्थ आपल्या हिंदी कवितेत म्हणतो…

मांग भरने की सजा

कुछ इस तरह पा रहा हूं…

मांग भरने की सजा कुछ इस तरह पा रहा हूं…

की मांग पुरी करते करते…

मांग के खा रहा हू…

(बाकी तुम्ही सूज्ञ आहात)

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner