marathi jokes : तुम्ही एक तास आधी आला असतात तर त्यांचा जीव वाचला असता असं जेव्हा डॉक्टर सांगतात…-joke of the day viral marathi jokes marathi short jokes jokes on husband wife jokes on teacher student chutkule ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : तुम्ही एक तास आधी आला असतात तर त्यांचा जीव वाचला असता असं जेव्हा डॉक्टर सांगतात…

marathi jokes : तुम्ही एक तास आधी आला असतात तर त्यांचा जीव वाचला असता असं जेव्हा डॉक्टर सांगतात…

HT Marathi Desk HT Marathi
Oct 02, 2024 10:41 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : नवऱ्याला पतीदेव असं का म्हणतात माहीत आहे का?
marathi jokes : नवऱ्याला पतीदेव असं का म्हणतात माहीत आहे का?

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

 

जे अमृत पितात, त्या देव म्हणतात!

जे विष पितात, त्यांना महादेव म्हणतात!

आणि…

विष पिऊनही जे अमृत प्यायल्यासारखा चेहरा ठेवतात, 

त्यांना पतीदेव म्हणतात!

आयुष्याच्या धावपळीत स्वत:चं आरोग्यही सांभाळा!

असं होऊ नये की तुम्ही मागे राहिलात आणि

पोट पुढं निघून गेलं!

डॉक्टर खाली मान घालून ऑपरेशन थिएटरच्या बाहेर येतात आणि म्हणतात…

सॉरी. आम्ही तुमच्या भावाला वाचवू शकलो नाही.

एक तास आधी तुम्ही आला असतात तर कदाचित त्याचा जीव वाचला असता!

पेशंटचा भाऊ - अहो डॉक्टर, अर्धा तास आधीच अ‍ॅक्सिडंट झालाय!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner
विभाग