Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एक मुलगा मुलीवर छाप पाडण्यासाठी जातो…
तिच्यासमोर जाऊन अमिताभचा दिवार सिनेमातला डायलॉग मारतो…
मुलगा - माझ्याकडं गाडी आहे, बंगला आहे, बँक बॅलन्स आहे…
मुलगी - माझ्याकडं तुझ्यासारखे चार आहेत.
…
ती वळून वळून बघायची मला…
मी वळून वळून बघायचो तिला…
कधी ती, कधी मी,
कधी मी, कधी ती,
कारण…
परीक्षेत ना तिला काही यायचं ना मला!
…
हेही वाचा : पिझ्झा खाताना त्याचे ८ तुकडे का करू नयेत? वाचा…
नवरा संध्याकाळी उदास चेहऱ्यानं घरी पोहोचला!
बायको - काय हो, असं का तोंड केलंय?
नवरा - आज आमच्या ऑफिसची बिल्डिंग पडून सगळे लोक मेले!
बायको - मग तुम्ही कसे वाचलात?
नवरा - मी तेव्हा सिगारटे प्यायला बाहेर गेलो होतो.
बायको - देवाची कृपा म्हणायची.
थोड्या वेळानं टीव्हीवर बातमी आली की मृतांच्या नातेवाईकांना सरकार १ कोटी रुपये देणार
बायको (रागाने) - तुमची ही सिगारेट प्यायची सवय कधी जाणार काय माहीत?
(नवरा बेशुद्ध)
संबंधित बातम्या