Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एक बाई दुसऱ्या बाईला - तुझी सून कशी आहे?
दुसरी - काय सांगू बाई, काही खरं नाही!
सकाळी उशिरा उठते.
माझा मुलगा तिच्यासाठी चहा बनवतो.
घरातलं काही काम करत नाही.
जेव्हा बघावं तेव्हा मुलाला बाहेरून जेवण मागवायला सांगते…
पहिली बाई - अरे बापरे! आणि तुझा जावई कसा आहे?
दुसरी बाई - तो तर देवमाणूस आहे.
रोज सकाळी माझ्या मुलीला चहा बनवून देतो.
घरातलं काही काम करू देत नाही.
बऱ्याच वेळा बाहेर जेवायला घेऊन जातो.
असा जावई सगळ्यांना मिळावा!
…
गणिताला वैतागलेला एक विद्यार्थी गुरुजींना विचारतो…
गुरुजी शून्याचा शोध आर्यभट्टने लावला होता असं तुम्ही म्हणता,
आर्यभट्ट कलियुगात जन्माला आला होता असं सांगता,
मग त्याच्याआधी
१०० कौरव आणि रावणाच्या १० तोंडांची मोजणी कुणी केली होती?
(उत्तर शोधण्यासाठी गुरुजी सुट्टीवर गेलेत!)