Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एका मुलाला त्याच्या मम्मीनं बदड बदड बदडलं!
मार खाल्ल्यानंतर मुलगा त्याच्या पप्पांकडं गेला…
पप्पांना म्हणाला, पप्पा तुम्ही कधी पाकिस्तानला गेलात का?
पप्पा - नाही.
मुलगा - मग कधी अफगाणिस्तानला गेला होता का?
पप्पा - नाही
मुलगा - मग ही आतंकवादी बाई कुठनं शोधून आणली?
…
प्रेयसी : मी जेव्हा-केव्हा फोन करते, तेव्हा तू नेहमी दाढीच करत असतोस?
प्रियकर : दिवसातून ३० ते ४० वेळा.
प्रेयसी : वेडा आहेस काय?
प्रियकर : वेडा नाही. माझं सलून आहे.
…
हेही वाचा : प्रियकर जेव्हा प्रेयसीला तिच्या अकलेवरून डिवचतो…
बाई शाळेत अर्थशास्त्राचा विषय शिकवत असतात...
शिकवता-शिकवता एक प्रश्न विचारतात…
बाई - एका बाजूला पैसे आणि दुसऱ्या बाजूला अक्कल, तुम्ही काय निवडाल?
बंड्या - पैसे मॅडम
बाई - चूक. मी अक्कल निवडली असती
बंड्या - तुमचं बरोबर आहे मॅडम. ज्याच्याकडं जी गोष्ट कमी असते, तीच त्यानं निवडली पाहिजे...
बंड्याला बाईंनी हाण हाण हाणला…