Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
काळे काकू दररोज नवीन चपला घालून शाळेत कामावर जायच्या.
न राहवून एक दिवस शाळेतील कुडमुडे बाईंनी विचारलंच!
काय ओ, तुम्ही काय चपलांचं दुकान सुरू केलंय का?
रोज नव्या चपला घालून जाता.
काळे काकू म्हणाल्या, नाही ओ. माझ्या घरासमोर मंदिर बनलंय.
…
प्रियकर - देवानं तुला इतकं सुंदर बनवूनही मूर्ख का ठेवलं?
प्रेयसी - आपल्या दोघांची भेट घालून देण्यासाठी
प्रियकर - म्हणजे?
प्रेयसी - म्हणजे, माझं सौंदर्य पाहून तू माझ्याकडं आकर्षित झालास आणि मी मूर्ख होते म्हणून तुझ्या प्रेमात पडले!
…
एक मित्र दुसऱ्या मित्राकडं गेला आणि त्याच्या दरवाजाची बेल वाजवली!
आतून एक लहान मुलगा आला.
मित्र - बाळा बाबा कुठे आहेत?
मुलगा - बाबा ऑफिसला गेलेत.
मित्र - आईला बोलवं
मुलगा - आईल किटी पार्टीला गेलीय
मित्र - तुझ्या मोठ्या भावाला बोलव
मुलगा - तो कॉलेजला गेलाय
मित्र - मग तू एकटा घरी काय करतोयस. तूही कुठंतरी जायचं.
मुलगा - मी सुद्धा माझ्या मित्राच्याच घरी आलोय.