marathi jokes : तुमचं वजन जास्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ही माहिती नक्की वाचा!
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : तुमचं वजन जास्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ही माहिती नक्की वाचा!

marathi jokes : तुमचं वजन जास्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ही माहिती नक्की वाचा!

HT Marathi Desk HT Marathi
Published Sep 25, 2024 10:09 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : तुमचं वजन जास्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ही माहिती नक्की वाचा!
marathi jokes : तुमचं वजन जास्त आहे असं तुम्हाला वाटत असेल तर ही माहिती नक्की वाचा!

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

जर का तुमचं वजन पृथ्वीवर १०० किलो असेल तर

मंगळावर ते ६८ किलो असेल…

आणि 

चंद्रावर फक्त १६ किलो.

याचा अर्थ तुम्ही अजिबात जाड नाही आहात.

फक्त चुकीच्या ग्रहावर आलेले आहात.

तुमच्या खाण्यापिण्यात काहीही बदल करू नका, फक्त ग्रह बदला!

बायको - मला सांगा लग्नाचा खरा अर्थ काय?

नवरा - हाच की, वाजत-गाजत स्वत:ची सुपारी देऊन टाकणं!

लग्नाच्या २५ व्या वाढदिवशी बायको जाम खूष दिसत होती.

तिनं नवऱ्याला लाडानं सांगितलं, अहो…

तुम्ही आज माझ्यासाठी काहीतरी अशी गोष्ट घेऊन या, ज्यामुळं माझ्या सौंदर्यात भर पडेल!

नवऱ्यानं काय आणलं असेल?

.

.

तो स्वत:साठी दोन दारूच्या बाटल्या घेऊन आला!

(जोक समजला नसेल तर पुन्हा वाचा!)

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner