Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
यमराज एकाला घ्यायला येतो…
यमराज - बालका, तुझी शेवटची इच्छा काय आहे?
तो - मला मुंबई-गोवा हायवे पूर्ण झालेला एकदा पाहायचाय
यमराज - सरळ सरळ सांग ना की तुला अमर व्हायचंय!
…
गुरुजींनी आज प्रश्नोत्तराचा तास घेतला
पण नंदूला एकही उत्तर देता आलं नाही.
गुरुजी भडकले.
नंदू म्हणाला, गुरुजी मी अभ्यास करतो, पण लक्षातच राहत नाही.
गुरुजी - मागच्या वेळी तू माझा मार कधी खाल्ला होतास
नंदू - मागच्या गुरुवारी
गुरुजी - हे कसं लक्षात राहिलं?
नंदू - गुरुजी माझा थेअरीचा प्रॉब्लेम आहे. प्रॅक्टिकलचा नाही!
…
एक बाई पोलिसांकडं जाते…
बाई - माझे मिस्टर तीन दिवसांपूर्वी गिरणीवर दळण आणायला गेले होते.
अजून परत आले नाहीत.
पोलीस - मग तुम्ही तीन दिवस काय करत होतात?
बाई - पहिल्या दिवशी इडली केली, दुसऱ्या दिवशी पोहे केले.
तिसऱ्या दिवशी थालीपीठ केलं.
शेवटी आज घरातलं पीठ संपलं, तेव्हा कंटाळून तुमच्याकडं आले.
(पोलीस सध्या बेशुद्ध आहे)