Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
आई - तू केस का कापत नाहीस?
बंड्या - ही आजकालची फॅशन आहे आई
आई- अरे नालायका काल लोक तुझ्या ताईला बघायला आले होते…
तुला पसंत करून गेलेत!
…
बायको - आजपासून मी तुमच्याशी बोलणार नाही.
नवरा - ठीक आहे.
बायको - (भडकून) तुम्हाला काहीच वाटत नाही. मी का बोलणार नाही हे सुद्धा तुम्ही विचारत नाही.
नवरा - नाही. मी तुझ्या निर्णयाचा आदर करतो.
…
दोन मुलांची आई तिसऱ्यांदा लग्न करत होती.
सप्तपदी सुरू होती.
तेवढ्यात तिचा एक मुलगा रडायला लागला.
मुलाला समजावण्यासाठी ती जे बोलली ते ऐकून नवरदेव बेशुद्ध झाला.
असं काय म्हणाली ती मुलाला?
ती म्हणाली, गप्प बस नाही तर पुढच्या वेळी आणणार नाही.