marathi jokes : लग्नाला २५ वर्षे झाल्याची आठवण जेव्हा बायको करून देते…-joke of the day viral marathi jokes marathi short jokes jokes on husband wife jokes on teacher student chutkule ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : लग्नाला २५ वर्षे झाल्याची आठवण जेव्हा बायको करून देते…

marathi jokes : लग्नाला २५ वर्षे झाल्याची आठवण जेव्हा बायको करून देते…

HT Marathi Desk HT Marathi
Sep 21, 2024 09:50 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : लग्नाला २५ वर्षे झाल्याची आठवण जेव्हा बायको करून देते…
marathi jokes : लग्नाला २५ वर्षे झाल्याची आठवण जेव्हा बायको करून देते…

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

बायको - आज आपल्या लग्नाला २५ वर्षे झाली.

वेळ कसा निघून गेला कळलंच नाही!

नवरा - वेळेचं महत्त्व कैद्याला कळतं, जेलरला नाही.

नवरा-बायकोमध्ये जोरदार भांडण झालं…

नवरा शेवटी रागानं बोललाच,

तुझ्यासारख्या ५० मिळतील!

बायको जोरजोरात हसायला लागली!

नवऱ्याला काही कळेचना!

तो आणखी वैतागला.

काय झालं हसायला!

बायको म्हणाली, तुम्हाला अजूनही माझ्यासारखीच पाहिजे?

साला काही कळायला मागत नाही!

बॉसला पगार वाढवायला सांगितला तर म्हणतो,

तू काय काम करतोस?

आणि 

सुट्टी मागितली तर म्हणतो,

तुझं काम कोण करणार?

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner
विभाग