Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एकदा बायको खूश होऊन नवऱ्याला सांगते…
बायको : अहो ऐका ना…
उद्या माझी आई येतेय…
नवऱ्याचं तोंड कडू होतं, पण थोड्याच वेळात सावरून तो बायकोला विचारतो…
तुझे पप्पा पण येतायत का?
बायको : नाही… का हो, असं का विचारताय?
नवरा : काही नाही गं, आले असते तर बरं झालं असतं, मला स्वयंपाकात मदत झाली असती!
…
एक तरुण (आपल्या मित्राला विचारतो…) - यार, तुला एवढ्या गर्लफ्रेंड कशा?
मित्र म्हणतो, अरे एका मुलीनं माझं हृदय तोडंलं…
आता माझ्या हृदयाचा प्रत्येक तुकडा वेगवेगळ्या मुलींवर प्रेम करतो…
प्रश्न विचारणाऱ्यानं मित्राचे पाय धरले…
…
तुम्ही सकाळी उशिरा उठत असाल तर अपराधी वाटून घेण्याची गरज नाही!
कारण,
जे लोक सकाळी उशिरा उठतात, ते आळशी नसतात…
त्यांची स्वप्नं मोठी असतात, ती बघायला वेळ लागतो…