Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
बंता : तू आरशासमोर बसून का अभ्यास करतोयस?
संता: याचे तीन फायदे आहेत
.
.
एक म्हणजे, सोबतच रिव्हिजन होऊन जातं
दुसरी, आपली स्वत:वर नजर राहते, आणि
तिसरं म्हणजे, अभ्यास करायला एक सोबत मिळते!
…
संतू आणि अंतू एकदा हॉटेलमध्ये जेवायला जातात
दोघेही सामोसे मागवतात
संतू - सामोस्याच्या आतली भाजी खायला लागतो.
अंतू - अरे संत्या, तू फक्त भाजीच खातोयस, वरचं कोण खाणार?
संतू - नाही मी ते खाणार नाही.
अंतू - का?
संतू - माझ्या आईनं सांगितलंय, बाहेरचं काही खायचं नाही!
…
हेही वाचा : या पावसाचं गणितच कळत नाही, आता हेच बघा ना…
बाबा - काल रात्री कुठे होतास?
मुलगा - मित्राच्या घरी ग्रुप स्टडी करत होतो.
बाबा - रात्रीची उतरली नाही वाटतं तुझी सोन्या
मुलगा - बाबा असं का बोलताय?
बाबा - तुला नौकरी लागून चार वर्ष झाली बेवड्या