Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
१३ वर्षे केस चालली तरी सलमान दारू प्यायला होता की नाही हे कोर्टाला कळलं नाही…
आणि आमच्या बायका…
फोनवर नुसतं हॅलो म्हटलं तरी,
कमी प्या आणि लवकर घरी या, सांगतात!
…
या पावसाचं गणितच कळत नाही…
धरणं भरली की याला जोर चढतो!
म्हणजे आधी पंगतीला खच्चून भाकरी, भात, रस्सा वाढायचा आणि
पोट भरल्याची खात्री पटली की,
मटणाची बादली फिरवायची!
…
जे मी बोलतो, ते मी करतोच!
आणि जे बोलत नाही, तेही करायला लागतं.
नाहीतर घरातले लाथेनं मारतात!