marathi jokes : नवरा-बायको दोघांनीही संस्कृत शिकून घ्यायला पाहिजे, कारण…
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : नवरा-बायको दोघांनीही संस्कृत शिकून घ्यायला पाहिजे, कारण…

marathi jokes : नवरा-बायको दोघांनीही संस्कृत शिकून घ्यायला पाहिजे, कारण…

HT Marathi Desk HT Marathi
Published Sep 17, 2024 10:32 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : नवरा-बायको दोघांनीही संस्कृत शिकून घ्यायला पाहिजे कारण…
marathi jokes : नवरा-बायको दोघांनीही संस्कृत शिकून घ्यायला पाहिजे कारण…

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

दर आठवड्याला वजन करतो…

नेहमी ६८ च्या आसपास असतं.

आज चष्मा लावून वजन केलं…

८८ किलो भरलं!

म्हणजे चष्मा २० किलोचा आहे काय?

नवरा-बायको दोघांनीही संस्कृत शिकून घ्यायला पाहिजे…

कधी भांडण झालं तर,

शेजाऱ्यांना वाटेल पूजा चाललीय!

कांदा-पोह्याचा कार्यक्रम सुरू असतो…

मुलीकडचे - आमच्या मुलीचा आवाज कोकिळेसारखा आहे

गळा मोरासारखा आहे आणि 

स्वभाव तर गायीसारखा आहे.

मुलाकडचे - तुमच्या मुलीमध्ये काही माणसाचे गुण आहेत का?

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner