marathi jokes : रोज सकाळी उशिरा उठूनही घरातले तुम्हाला काहीच बोलत नसतील तर…-joke of the day viral marathi jokes marathi short jokes jokes on husband wife jokes on teacher student chutkule ,लाइफस्टाइल बातम्या
मराठी बातम्या  /  लाइफस्टाइल  /  marathi jokes : रोज सकाळी उशिरा उठूनही घरातले तुम्हाला काहीच बोलत नसतील तर…

marathi jokes : रोज सकाळी उशिरा उठूनही घरातले तुम्हाला काहीच बोलत नसतील तर…

HT Marathi Desk HT Marathi
Sep 16, 2024 10:07 AM IST

Marathi Short Jokes : हसण्यामुळं चेहऱ्याच्या स्नायूंचा व्यायाम होतो. चेहरा ताजातवाना आणि टवटवीत राहतो. तुम्हालाही तरुण दिसायचं असेल आणि निरोगी राहायचं असेल तर हसण्याची सवय लावा. हे जोक वाचा!

marathi jokes : सकाळी उशिरा उठूनही घरातले तुम्हाला काही बोलत नसतील तर…
marathi jokes : सकाळी उशिरा उठूनही घरातले तुम्हाला काही बोलत नसतील तर…

Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…

 

मला एक गोष्ट कळत नाही!

सगळे जण त्यांच्या वैवाहिक जीवनाला वैतागलेले असतात!

लग्न करून खूप मोठी चूक झाली असं म्हणतात…

.

.

मग लग्नाचा वाढदिवस एवढ्या जोरात का साजरा करतात?

जर सकाळी तुम्ही उशिरा उठत असाल आणि 

घरचे तुम्हाला काहीच बोलत नसतील 

तर समजू जा की,

एकतर तुम्ही आयुष्यात खूप यशस्वी आहात किंवा

घरच्यांनी तुम्हाला वाऱ्यावर सोडलंय!

भोळ्या-भोळ्या बायकांचं सर्वात आवडतं वाक्य

माझा नवरी पीत नाही हो,

त्याचे मित्रच त्याला पाजतात!

पण ह्या बायकांना कोण सांगणार की

तिचा गंगाधरच शक्तीमान आहे म्हणून!

 

(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअ‍ॅप)

Whats_app_banner
विभाग