Viral Jokes In Marathi: आजकाल धावपळीच्या जीवनशैलीमुळे प्रत्येकाला ताणतणावाला सामोरं जावं लागतं. अशा वेळी माणसाला काही निवांत आणि मन प्रसन्न करणाऱ्या क्षणांची सोबत हवी असते. शब्द ही सोबत देऊ शकतात. हे लक्षात घेऊन तुम्हाला तणावमुक्त आणि सकारात्मक ठेवण्यासाठी आम्ही काही मजेदार जोक्स घेऊन आलो आहोत. ते वाचून तुम्हाला हसू आवरणार नाही! वाचा तर मग…
एक बरं आहे की सर्व देव भारतातच होऊन गेले...
नाहीतर तर...
घरातल्या बायकांनी हट्ट धरला असता...
लंडनच्या भैरोबाचा नवस आहे, फेडायला जायचंय...
जपानच्या देवीला बोलले होते, एकदा दर्शनाला येते...
ऑस्ट्रेलियात वारीला पटकन जाऊन येते...
नवरा आयुष्यभर उधारीत, आणि बायको वारीत!
-------------------------------
नातु : हॅलो आजी. इंद्रजित बोलतो.
आजी : कोण बोलतोय? नीट ऐकु येईना.
नातु : इंद्रजित बोलतोय म्हटलं.
आजी : इंग्रजीत नको बाबा मराठीतच बोल
-------------------------------
एकदा एक तरुण चालत असताना, सहज इमारतीच्या दुसऱ्या मजल्यावर त्याचे लक्ष जाते.
तिथेएक सुंदर मुलगी हातात झाडू आणि सुपली घेऊन उभी असते.
ती सुपलीताला कचरा खाली टाकते आणि तिचे लक्ष त्याच्याकडे जाते.
तो पाहताच रहातो.
तीही लाजते.
.
.
असे ५-६ दिवस रोज घडते...
शेवटी ७ व्या दिवशी ती खाली येते आणि त्याचा पाठलाग करून त्याला गाठते...
.
.
ती :- नाव काय तुझे...रोज रोज पाहतोस काय नुसता...
.
तो :- मी समीर...
.
ती:- मग...बोल न काहीतरी...
.
तो :- तुझा वाढदिवस कधी आहे ?
.
ती :- लाजून तारीख सांगते...
.
तो :- ठीक आहे मी तुझ्या वाढदिवशी तुला इथेच भेटेन... येशील न?
.
ती :- हो का नाही... नक्की येईन!
.
.
दोन महिने तसेच जातात आणि तिच्या वाढदिवशी तो तिला तिथेच पुन्हा भेटतो ....
.
हातात गिफ्ट पॅक केलेला मोठा बॉक्स असतो...
ते तिला देतो आणि वाढदिवसाच्या शुभेच्या देऊन निघून जातो...
.
.
ती अचंबित होऊन पहातच राहाते...
.
.
मग ती घरी जाऊन गिफ्ट उघडते, तर त्यात एक डस्टबीन आणि
चिठ्ठी असते ...
.
चिठ्ठीत लिहिलेले असते ..
सुंदर आहेस,
परिसर देखील सुंदर ठेव,
कचरा डस्टबीनमध्येच टाक...
.
वाढदिवसाच्या खूप खूप शुभेच्छा...!
-------------------------------
चिंटू - पप्पा तुमच्या डा…
पप्पा - चूप… किती वेळा तुला सांगितलं, जेवताना असं मध्येमध्ये बोलू नकोस म्हणून...
मग जेवण झाल्यानंतर…
पप्पा - आता सांग चिंटू काय बोलत होतास?
चिंटू- पप्पा, तुमच्या डाळीत माशी पडली होती.
(टीप : हा निखळ विनोद आहे. त्याकडे विनोदाच्या नजरेतूनच पाहावे. यातून कोणत्याही प्रकारे कोणाच्याही भावना दुखावण्याचा हेतू नाही. स्त्रोत - व्हॉट्सअॅप)